मराठीत टायपींग कसे करावे?

मराठीत टायपींग करणे अजिबात अवघड नाही. खालील अ‍ॅप्सची आपण मदत घेवून मराठी टायपींग करू शकतात.
admin
Site Admin
Posts: 7
Joined: Mon Jan 27, 2020 6:58 pm

मराठीत टायपींग कसे करावे?

Unread post by admin »

मराठीत टायपींग कसे करावे?

मराठीत टायपींग करणे अजिबात अवघड नाही. खालील अ‍ॅप्सची आपण मदत घेवून मराठी टायपींग करू शकतात.

पहिल्यांदा मोबाईल मधून मराठी टायपींग कसे करावे ते पाहू. नंतर खाली कॉम्पूटरमधल्या एडीटरमध्ये मराठी टायपींग कसे करावे ते सांगितलेले आहे.

अ. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोनवर मराठीतून लिहायचे असल्यास:

१. Indic Keyboard
या अ‍ॅपने तुम्ही फोनेटीक टायपींग करू शकतात. एकदम सोपे आहे. तुम्ही "Namaste" टाईप केले की "नमस्ते" असे टाईप झालेले असेल.
https://play.google.com/store/apps/deta ... c&hl=en_IN

२. Google Indic Keyboard
हे अँप मराठी टायपिंग साठी योग्य आहें.
https://play.google.com/store/apps/deta ... i&hl=en_IN

३. Gboard - the Google Keyboard
हे देखील गुगलचे अ‍ॅप आहे. यात मराठी किबोर्ड फोनेटीक नसला तरी लिहीणे सोपे जाते.

https://play.google.com/store/apps/deta ... n&hl=en_IN

४. Marathi Keyboard
हे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल साठी मराठी टायपींगचे इतरही कीबोर्ड आहेत. यातून आपणाला जो पाहिजे तो इन्टॉल करा आणि मराठी लिहायला सुरूवात करा.
https://play.google.com/store/search?q= ... s&hl=en_IN

--------------------------------------------------

ब. कॉम्पूटरवर मराठीतून टायपींग करायचे असल्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

१. गुगल क्रोम ब्राऊजर एक्स्टेंशन इन्टॉल करा.
https://chrome.google.com/webstore/deta ... cijmpgbhab

इन्स्टॉल केल्यानंतर क्रोम ब्राऊजरच्या उजव्या कोपर्‍यात Google Input Tools वर क्लिक करून मराठी किंवा देवनागरी फोनेटीक टायपींगचा पर्याय स्विकारा आणि मराठी लिहायला सुरूवात करा.

२. CDAC चे ISM ( Intelligent Script Manager ) सॉप्टवेअर कॉम्पूटरमध्ये इन्स्टॉल करू शकतात.
https://www.cdac.in/index.aspx?id=dl_IS ... etup_64Bit

३. आपण मंगल, अपराजीता, अक्षर यासारखे युनीकोड मराठी फॉन्ट डाउनलोड करू शकता. हे इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहेत.

आपण तेथे जे काही लिहाल ते कॉपी करण्याची आणि आपल्याला पाहिजे त्यामध्ये पेस्ट करण्याची आवश्यकता आहे.

तर दोस्तांनो, मराठी टायपींग करायला घाबरू नका. एखाद दिवसाच्या प्रॅक्टीसने तुम्ही एखाद्या प्रोफेशनलसारखे टायपींग करू शकतात.

चला तर मग, मराठी लिहा.Locked